Mumbai BJP Meeting Turns Heate Saam Tv
मुंबई/पुणे

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Mumbai BJP Meeting Turns Heate: मुंबई महानगर पालिकेतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी महापौरांसह सर्व नगरसेवकांना खडेबोल सुनावले.

Priya More
  • मुंबई भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली

  • मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरांना सुनावले खडेबोल

  • अमित साटम यांनी रितू तावडेंसह नगरसेवकांची घेतली बैठक

  • भाजप नगरसेवकांना अमित साटम यांचा सज्जड दम

  • नगरसेवकांच्या एक वर्षाच्या कामगिरीवर पुढील निधी मिळणार

गिरीश कांबळे, मुंबई

मुंबई महानगर पालिकेतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत खडाजंगी झाली. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सज्जड दम दिला. मुंबई महानगर पालिकेत काही चुकीचं निर्णय झाल्यास सर्वस्वी तुम्ही चौघे जबाबदार असाल, असे ते म्हणाले. एक वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार असल्याचे देखील अमित साटम यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेत भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने सोमवारी सर्व नगरसेवकांची महत्वाची बैठक घेण्यात आली. नगरसेवकांच्या बैठकी अगोदर महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्यात बैठक झाली. मुंबई अमित साटम यांनी सर्व भाजप नगरसेवकांची बैठक घेत पुढील ध्येय धोरणे, वॉर्ड स्तरावर कामे, निधी इत्यादीवर चर्चा करून सूचना केल्या आहेत.

मुंबई महापालिका सभागृहात अन्य समित्यांमध्ये भाजप नगरसेवकाकडून उपस्थित केले जाणारे हरकतीचे मुद्दे आणि ठरावाच्या सूचना, विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका आणि सभागृहात सत्ताधाऱ्यापेक्षा वरचढ ठरणारे विरोधक यासह अन्य मुद्द्यांवरून भाजपच्या नगरसेवकांना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी समज दिली.

मुंबईकरांना गृहीत धरू नका. तुमच्या एक वर्षाच्या कामगिरीवरच पुढचा निधी उपलब्ध होईल असे खडेबोल अमित साटम यांनी सर्व नगरसेवकांना सुनावले. यापुढे महापालिका सभागृहात आणि अन्य समितीमध्ये घेण्यात येणारे हरकतीचे मुद्दे महापौर, महापालिका गणेशखणकर यांच्याशी चर्चा करूनच मांडावेत, असे देखील यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT