Nawab Malik Vs BJP
Nawab Malik Vs BJP Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik Resign: नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा मोर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले असून आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून (BJP) मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आझाद मैदानात (Azad Maidan) भाजपचे कार्यकर्ते जमतील आणि त्यानंतर मंत्रालायाचे दिशेने कूच करतील. भाजपचे सर्व आमदार (MLA), मुंबईतील नगरसेवक, खासदार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. (BJP front for the resignation of Nawab Malik)

हे देखील पहा-

आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर (Mumbai) असे शेकडो बॅनर्स भाजपकडून लावण्यात आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहामध्ये ठेवण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिले आहेत. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने PMLA कोर्टामध्ये दिली आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिकांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहामध्ये होणार आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोपांनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झालेले बघायला मिळाले आहे. परंतु, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी ठाम भूमिका सत्ताधारी पक्षाने यावेळी घेतली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddh Akapoor : श्रद्धाचा अस्सल रावडी स्वॅग

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

SCROLL FOR NEXT