Tushar Apte submits his resignation after massive backlash over his appointment as a councillor in Badlapur. Saam Tv
मुंबई/पुणे

लैंगिक अत्याचारातील आरोपी भाजपचा नगरसेवक, बदलापूर प्रकरणातील आरोपीला भाजपचं बक्षीस

Badlapur Controversy: महापालिका निवडणुकीत भाजपमागील संकंटांची मालिका संपायला तयार नाही...भाजपच्या नेत्यांनी अकोटमध्ये MIMसोबत युती..अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत हात मिळवणी केली...हे कमी होतं की काय ? बदलापूरमध्ये तर भाजप नेत्यांनी थेट ताळतंत्रच सोडल्याचं पुढं आलं...

Bharat Mohalkar

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या जखमा भरण्याच्या आतच भाजपनं आरोपीला बक्षीस दिलंय. तुषार आपटेला भाजपनं बदलापूर कुळगाव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपद दिलं आणि राज्यात संतापाची लाट उसळीय.. दुसरीकडे आपटेनं नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम केल्यानंच त्यांना स्वीकृत नगरसेवक केल्याचा दावा केलाय... हाच धागा पकडून ठाकरेसेनेनं भाजपला घेरलंय.. लैंगिक अत्याचार केल्याबद्दल तुषार आपटेला भाजपनं इनाम दिलाय का? असा सवाल करत ठाकरेसेनेनं भाजपवर तोफ डागलीय... तर आपटेला नगरसेवकपद देण्यातून भाजपची मानसिकता दिसत असल्याची टीका काँग्रेसनं केलीय.

मनसेनेही भाजपवर हल्लाबोल केलाय. आपटेचा तातडीनं राजीनामा घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.. अखेर मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तुषार आपटेला राजीनामा देण्याचे आदेश दिले.. त्यानंतर आपटेनं राजीनामा दिलाय...

याआधी अकोटमध्ये एमआयएम बरोबर आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केल्यानं भाजपवर टीका झाली होती. त्यानंतर ही युती तोडण्याची नामुष्की पक्षावर ओढावली. त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन भाजपवर नामुष्की ओढावली आहे. खरतंर बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.. बदलापूरमध्ये तर नागरिकांनी लोकल अडवून संताप व्यक्त केला होता....

यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक केली आणि पुढे त्याचा एन्काऊंटर झाला. आरोपी आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आता तुषार आपटे जामीनावर बाहेर आहे.... मात्र एवढा गंभीर गुन्हा असतानाही आणि जनतेच्या मनात संताप असतानाही तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद दिलंच कसं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

SCROLL FOR NEXT