Devendra Fadnavis On Bharat Jodo Yatra  Saam TV
मुंबई/पुणे

ही भारत जोडो नाही, तर मोदी हटाव यात्रा; राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याआधीच फडणवीसांचं टीकास्त्र

'विरोधक कितीही एकत्र आलेत. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हटणार नाही. कारण मोदी हे लोकांच्या मनामध्ये बसलेले आहे', असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नाही, तर मोदी हटाओ यात्रा आहे', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. 'विरोधक कितीही एकत्र आलेत. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हटणार नाही. कारण मोदी हे लोकांच्या मनामध्ये बसलेले आहे', असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. देशातील तसेच महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकारचं वातावरण पाहता अनेक पक्षांना ही भीती वाटायला लागली आहे की, कदाचित आपले आमदार आपल्या पक्षात टिकणार नाही त्यामुळे त्यांना निवडणुकीची भीती दाखवली जात आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेता लगावला आहे.

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. यात्रा सुखरूपपणे महाराष्ट्राच्या बाहेर जाईल अशी आम्ही व्यवस्था करू, जे काही कार्यक्रम भारत जोडो यात्रेदरम्यान, घेतले जाईल ते कायदेशीरित्या योग्य पार पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेबद्दल माहिती दिली. भारत जोडो या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT