Chandrashekhar Bavankule saam tv
मुंबई/पुणे

BJP on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री, 'भावी मुख्यमंत्री' बॅनरबाजीवरुन भाजपचा खोचक टोला

Dnyaneshwar Choutmal

Mumbai News : महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये 3 मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीत 3 मुख्यमंत्री आहेत, तर शिवसेनेकडे दोन मुख्यमंत्री आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

भावी मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या नेत्यांचे लागणारे बॅनर लागत असल्याच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची फिरकी घेतली. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत.

काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण यांचे तर राष्ट्रवादीमधील सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले जात आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव यांचेही मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागत आहे. असे जवळपास दहा मुख्यमंत्र्यांचे हे तीन पक्षांकडे असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, पाटणा येथे झालेल्या बैठकीवरील प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटलं की, बैठकीतील उपस्थितांनी जे जे म्हटलं, त्याच्या उलट चित्र पाहायला मिळेल. 2019 ला 17 पक्ष एकत्र आले होते. आता 19 जण एकत्र आले आहेत. त्या सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचं आहे. मात्र लोक याही वेळी नरेंद्र मोदींनाच मत देतील, असा विश्वासही यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT