Theft In ATM Machine Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai ATM News: 200 एटीएम सेंटरमधून 2 दिवसांत अडीच कोटी रूपये लंपास; चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai Police: एटीएम मशीनमधील (ATM Machine) पैसे चोरी प्रकरणी मोठी घटना समोर आली आहे. देशातील 18 राज्यातील 200 एटीएम सेंटरमध्ये मोठी चोरी झाली आहे. एटीएम मशीनमधून दोन दिवसांत तब्बल अडीच कोटी रूपये गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईतल्या गोरेगावमधील वनराई पोलीस ठाण्यात (Goregaon Vanrai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून एटीएममधील पैसे चोरी करणाऱ्यांचा शोध घेत आहे.

चोरांनी नवीन शक्कल लढवून एटीएम मशीनमधून कोट्यवधी रुपये लंपास केले आहेत. एटीएम सेंटरचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत करून तांत्रिक बिघाड निर्माण करून चोरट्यांनी कोट्यवधी रुपये गायब केले आहेत. हा एटीएम घोटाळा समोर येण्यासाठी तब्बल आठ महिने लागले आहेत. 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2022 या दोन दिवसांमध्ये देशभरातील एटीएममधून कोट्यवधी रुपये काढण्यात आले आहेत.

एटीएममधील पैसे लंपास करण्यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या बँकांच्या 872 डेबिट कार्डचा वापर करून अडीच कोटी रुपये लंपास केले. 2,743 वेळा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोरीचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मेसर्स हिताची पेमेंट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने एटीएम मशीन तयार करून देशभरात पुरवलले जातात. आता या चोरी प्रकरणी या कंपनीनेच मुंबईतल्या वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एटीएममधील पैसे चोरणाऱ्या या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून पैसे काढण्यासाठी आरोपी स्वत:चं डेबिट कार्ड वापरुन सामान्य प्रक्रिया सुरु करतात. त्यानंतर पैसे एटीएम डिस्पेन्सरी शटरपर्यंत पोहोचताच. त्याठिकाणी उपस्थित असलेली दुसरी व्यक्ती तिथली इलेक्ट्रिक वायर किंवा लॅन केबल ओढून वीजपुरवठा खंडीत करते. जेणेकरुन हा तांत्रिक बिघाड असल्याचे भासवले जात होते.

त्याचवेळी पहिली व्यक्ती डिस्पेंसिंग शटरमधून पैसे खेचून काढून घ्यायची. तांत्रिक बिघाडामुळे मशीनमध्ये संबंधित व्यवहाराची नोंद होत नाही आणि पैसे पुन्हा ग्राहकाच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले जातात. परिणामी यामध्ये कंपनीचे नुकसान होते. अशापद्धतीची शक्कल लढवून ही टोळी एटीएममधील पैसे गायब करत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT