Thackeray Family  Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Family Security : ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही काढून घेतल्या; शिंदे सरकारचा निर्णय

Political News : उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकेर आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे.

अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गुंतले होते. मात्र आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्ंयामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी उद्धरे ठाकरे यांना झेड प्लस सिक्युरिटी तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सिक्युरीटी होती. मात्र आता त्यांची सिक्युरिटीत कपात करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील कमी केल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Latest News)

मातोश्रीच्या सुरक्षेततही कपात

ठाकरे कुटुंबियांसह मातोश्री जवळपासच्या परिसरातील सुरक्षा देखीलकमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिस तैनात असतात. मात्र आता ती सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षा कमी केल्यानंतर आता हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT