Eknath Shinde not reachable, Eknath Shinde Latest News SaamTv News
मुंबई/पुणे

मोठा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंसह हे '१७' आमदार नॉट रिचेबल; मविआ सरकार धोक्यात?

Shivsena Eknath Shinde Latest News : शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. आज (मंगळवारी) दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातंय. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी ढवळाढवळ सुरू झाली आहे. (Eknath Shinde Latest News)

हे आमदार आहेत नॉट रिचेबल

१) स्वतः एकनाथ शिंदे, ठाणे

२) अब्दुल सत्तार, सिल्लोड

३) प्रताप सरनाईक, ठाणे

४) संदीपान भुमरे, पैठण

५) संजय शिरसाठ, औरंगाबाद

६) बालाजी किणीकर, अंबरनाथ

७) विश्वनाथ भोईर, कल्याण पश्चिम

८) भरत गोगावले, महाड

९) शहाजी पाटील, सांगोला

१०) महेंद्र थोरवे, कर्जत

११) महेंद्र दळवी, अलिबाग

१२) संजय रायमूलकर, बुलडाणा

१३) संजय गायकवाड, बुलडाणा

१४) महेश शिंदे, सातारा

१५) संजय राठोड, यवतमाळ

१६) श्रीनिवास वनगा, पालघर

१७) रमेश बोरणारे, वैजापूर

शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही म्हटले आहे. मात्र ते कुठे आहेत असं कधी सांगायचं असतं का, असा सवाल त्यांनी विचारला. अशा गोष्टीवर कोणतेही भाष्य करु नये. अन्यथा त्याला काहीही अर्थ उरत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, शिवसेना नाराज आमदार आणि शिंदे नॉट रिचेबल असल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाकडून आपआपल्या आमदारांना संपर्क तात्काळ सुरु केला आहे. (Eknath Shinde not reachable)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT