Big news Shiv Sena leader Aaditya Thackeray filed a case in Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Aditya Thackeray News: राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

Aditya Thackeray Latest News:

राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिेच्या रोड डिपार्टमेंटच्या तक्रारीनंतर एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे. या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते तसेच पदाधिकारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गुरुवारी रात्री परेल येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती.पण याच डिलाई रोड ब्रिजच्या लेनच्या उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई महापालिकेने एन एम जोशी पोलीस (Police) स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला.

दरम्यान, मुंबई महापालिकेने साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ठाकरे गटाने अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं महापालिका प्रशासनाचे म्हणणं असल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे या पुलाचे काम आधी रखडवले होते. आमच्या मागणीनंतर ते पूर्ण झाले. यास आता अनेक दिवस झाले आहेत. आता कुणासाठी या पुलाचे उद्घाटन थांबवले आहे. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांची कोंडी करणार का? त्यामुळे लोकांसाठी उद्घाटन केले, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT