ajit pawar group twitter account suspended Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar News: मोठी बातमी! अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड; समोर आलं मोठं कारण...

Ajit Pawar Group Twitter Account: ट्विटर म्हणजेच एक्सकडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

Satish Daud

Ajit Pawar Group X Account Suspended: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाउंट देखील वेगळे आहेत. यातल्या अजित पवार गटाच्या अकाऊंटवर कारवाई झाली आहे. ट्विटर म्हणजेच एक्सकडून अजित पवार गटाचं अधिकृत अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यावर सध्या कोणतीही पोस्ट दिसत नाहीये. (ajit pawar group twitter account suspended)

नियम न पाळल्याने हे अकाउंट सस्पेंड करण्यात आलं असल्याचं ट्विटरकडून (एक्स) सांगण्यात आलं आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. मात्र, ट्विटरने नेमक्या कोणत्या नियमांचं उल्लघंन केल्याने ही कारवाई केली, याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

2 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांना घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार यांना आपलं समर्थन दिलंय. तर काही आमदार अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

अजित पवारांसोबत गेलेले आमदार अपात्र होणार?

दरम्यान, अजित पवार गटाकडून आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला जातोय. अशातच अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांनी मोठा प्लान आखला आहे. अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांची धाकधूक वाढल्याची माहिती आहे.

विशेष बाब म्हणजे, अपात्रतेच्या कारवाईसाठी एक अर्ज पुरेसा असताना, दोन स्वतंत्र अर्ज करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता यामागे  शरद पवार (Sharad Pawar) यांची काही नवी खेळी आहे का? यासंदर्भातील तर्क-वितर्कांना विधान आलं आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडून अपात्रतेचा अर्ज दाखल होताच अजित पवार गटातील आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT