Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं

आमदार भरत गोगावले यांनी साम टीव्हीसोबत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या गटाला अधिकृत नाव दिल्याची माहिती आहे. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असं या गटाचं नामकरण करण्यात आलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी साम टीव्हीसोबत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात नाटकीय घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता एकनाथ शिंदे नेमका पुढे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरे यांचं पुढचं पाऊल काय असेल असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडले आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला अधिकृत नाव दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’, असं ठेवलं आहे.

“शिवसेना बाळासाहेब असं गटाचं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे." असं बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी साम टिव्हीसोबत बोलतांना सांगितलं आहे. (Eknath Shnde Group New Name)

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने महाराष्ट्रातील शिवसैनिक आणखीच आक्रमक झाले आहे. जाणिवपूर्वक आपल्या गटाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देवून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला भावनिक करत आहे. असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. शिवसेनेतून बंड करून कुणी शिवसैनिक होतो का? असा प्रश्नही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असं ठेवण्यात आलं आहे. या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या नावाची लवकरच एकनाथ शिंदे गटाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

SCROLL FOR NEXT