Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

Maharashtra IAS Officer Transfer List: शिंदे सरकारने विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी दिले आहेत.

Vishal Gangurde

सूरज सावंत

Maharashtra IAS Officer Transfer List:

राज्यात आज सोमवारी ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. शिंदे सरकारने विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी अर्थात १३ नोव्हेंबरला दिले आहेत. (Latest Marathi News)

शिंदे सरकारच्या आदेशात अधिकारी आशीष शर्मा, प्रवीण पुरी,दीपक तावरे, विकास पानसरे आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

१. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव IAS आशीष शर्मा यांची (1997) राज्य कर (GST) मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. सहसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे (मंत्रालय) सहसचिव IAS प्रवीण पुरी (2011) यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक IAS दीपक तावरे (2013) यांची कर्मचारी राज्य विमा योजनाचे आयुक्त (मुंबई) म्हणून करण्यात आली आहे.

४. अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष IAS विकास पानसरे यांची कोकण विभागाचे (मुंबई) अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक IAS अमन मित्तल यांची पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या (मंत्रालय) उपसचिवपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाच्या वेशात चोरी ; रांजणगावातील चोरटा सीसीटीव्हीत कैद

Shocking : नाशिकमध्ये भयंकर घडलं! दाजीनं सालीला पत्नीसमोर संपवलं; धक्कादायक कारण समोर

Deool Band 2 Collection : स्वामींच्या नावानं महाराष्ट्र दुमदुमला; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई, आकडा वाचून थक्क व्हाल

अपात्र लाडक्या बहीणींचा लाभ पुन्हा सुरू होणार? E- KYC केंद्रांवर वाढली महिलांची गर्दी

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

SCROLL FOR NEXT