Abhijeet Bichukle Saam Tv
मुंबई/पुणे

Abhijit Bichukale Accident News: मोठी बातमी! अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याचा पुण्यात अपघात झाला आहे

साम टिव्ही ब्युरो

Abhijit Bichukale News : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याचा पुण्यात अपघात झाला आहे. या अपघात अभिजीत बिचुकले याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर बिचुकलेला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (Latest Marathi News)

अभिजीत बिचुकले पुण्यात आला होता. पुण्यात त्याच्या कारला अपघात झाला. त्याच्या चार मित्रांनाही अपघातात दुखापत झाली आहे. बिचुकलेला रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सातारकर असलेला बिचुकले कामानिमित्त पुण्यात आला होता.

बिचुकले याच्या अपघाताचे वृत्त कळल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अपघातानंतर त्याच्या नातेवाईक आणि मित्रांनी फोन करून विचारपूस केली आहे. अभिजीत बिचुकलेच्या अपघाताचं वृत्त पसरल्यानंतर चाहत्यांकडून त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, अभिजीत बिचुकले हे मनोरंजन क्षेत्रातील मोठं नाव आहे. अभिजीत बिचुकले नेहमी अनेकांच्या चर्चेचा विषय असतो . मराठी बिग बॉस गाजवल्यानंतर त्याने हिंदी बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. हिंदी बिग बॉसमध्ये बिचुकले सलमान खानसोबत बिनधास्तपणे बोलताना दिसायचा. तसेच राखी सावंतशी अनेकदा वाद घातलाना दिसायचा.

दरम्यान, अभिजीत बिचुकलेचा नेमका अपघात कसा झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघात आणि उपचारानंतर प्रसार माध्यमांशी बिचुकलेने संवाद साधला. बिचुकले म्हणाला, माझी तब्येत स्थिर असून काळजीचं कारण नाही. डोक्याला मार किरकोळ लागला आहे. त्यातून लगोलग सावरेल, अशी पहिली प्रतिक्रिया बिचुकलेने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT