Abhijeet BichukaleOn EVM Saam Tv
मुंबई/पुणे

Abhijeet Bichkule: मला ९२ नव्हे 'इतकं' मते हवी होती; अभिजीत बिचुकलेंनाही EVMचा संशय, सांगितला मतांचा आकडा

Abhijeet Bichkule On EVM: बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही ईव्हीएमच्या वादात उडी घेतलीय. ईव्हीएमविरोधातील आंदोलनाला आपला पाठिंबाही त्यांनी दिलाय.

Bharat Jadhav

ईव्हीएमवरून राज्यातील राजकारण तापलंय. अभिजीत बिचुकले यांनीही ईव्हीएमच्या वादात उडी घेतलीय. शरद पवारांचा इतका दारूण पराभव होऊ शकत नाही. ईव्हीएमविरोधात आंदोलनासाठी शरद पवारांना माझा पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ईव्हीएमवरून वाद पेटलाय. या वादात बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनीही उडी घेतलीय. कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी विधासभेत मिळालेल्या मतांची आकडेवारी मांडल्यानंतर आता बिचुकले यांनीही आपल्या मतांची आकडेवारी मांडत प्रश्न उपस्थित केलाय.

महायुती आणि मविआमध्ये आता ईव्हीएमवरून संघर्ष सुरू झालाय. मारकडवाडीतील विधानसभेच्या निकालावरून ईव्हीएमवर संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर हल्लाबोल केला जात आहे. शरद पवार यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त करत विधानसभेतील मतांच्या आकड्यांमध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता. आता अभिजीत बिचुकलेंनी मतांवरून सवाल उपस्थित केलाय. बारामतीमध्ये मला २०० मत पडायला हवी होती. मला केवळ ९२ मते कशी, असा सवाल त्यांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला विस्मरून सांगावं की, ईव्हीएममध्ये घोटाळा नाही . असाही सवाल त्यांनी मोदींना केलाय. पवार साहेबांचा एवढा दारून पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही. पवार साहेबांनी यावर ठोस पाऊल उचलावं 'मी पवार साहेबांच्या मागे उभा असल्याचं बिचुकले म्हणालेत.

त्यानंतर त्यांनी त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी सादर केली. आपल्याला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते म्हणजे मोजून २०० मते मिळाली पाहिजे होती. असा दावा बिचकुले यांनी केलाय. बारामतीमध्ये मला 200 मत पडायला हवी होती, मला केवळ 92 मते कशी, असा सवाल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरणं ठरतंय घातक, तज्ज्ञांचा इशारा

Kumbha Rashi : आरोग्याची समस्या, पण ध्यान-प्रार्थनेत दडलेले गुपित यश, वाचा राशीभविष्य

Param Sundari Collection : सिद्धार्थ-जान्हवीच्या केमिस्ट्रीची चाहत्यांना भुरळ, 'परम सुंदरी'ची २ दिवसांत छप्परफाड कमाई

बेपत्ता तरुणीचं गूढ उकललं; खंडाळा घाटात नेलं अन् बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं; रत्नागिरीत खळबळ

Ukadiche Modak Tricks: उकडीचे मोदकाच्या कळ्या नीट येत नाही? पीठ बनवताना वापरा 'हे' ट्रिक्स मोदक तुटणार नाही

SCROLL FOR NEXT