Kasba By Election, Raj Thackeray, MNS News Update
Kasba By Election, Raj Thackeray, MNS News Update SAAM TV
मुंबई/पुणे

Pune MNS News : पुण्यात मनसेला मोठं खिंडार; एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नेमकं कारण काय?

साम टिव्ही ब्युरो

Pune MNS News : एकीकडे पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. पुण्यात एकाचवेळी ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) कसबा निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. मात्र, काही पदाधिकारी महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींना मिळाली. यावर कठोर पाऊलं उचलत पक्षश्रेष्ठीनी ७ कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली.

दरम्यान, या हकालपट्टीनंतर काही पदाधिकारी नाराज झाले. आणि याच नाराजीतून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता पुण्यातील याच ५० पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कसब्यात रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याची उघड भूमिका घेतली आहे.  (Maharashtra Political News)

पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आता मनसेला पडलेल्या भगदाडामुळं त्याचा भाजपलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पदाधिकाऱ्यांची मनसेकडून हकालपट्टी

कसब्यात महाविकास आघाडीचा प्रचार केल्याप्रकरणी मनसेनं (MNS Pune) रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम यांची हकालपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी केली होती.

त्यानंतर आता मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याच्या बातम्या आल्यानंतर पुण्यातील मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT