Accused Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त, एकाला अटक

नायट्राझेपमबाबत मुंबईतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

सुरज सावंत

मुंबई - अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने(एनसीबी) बोरीवली (Borivali) पूर्व येथे केलेल्या कारवाईत नायट्राझेपम या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ७५०० नायट्राझेपमच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून ३७ वर्षीय व्यक्तीला एनसीबीने अटक केली. नायट्राझेपमबाबत मुंबईतील (Mumbai) ही सर्वात मोठी कारवाई आहे.

नुरूद्दीन अहमद शेख (३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी पूर्व येथील रहिवासी आहे. एनसीबीला मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे बोरीवली पूर्व नॅशनल पार्क जवळील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात शोध मोहिम राबवण्यात आली. तेथून ७५०० नायट्राझेपमच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

नायट्राझेपम गोळ्यांची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. विशेष नायट्राझेपम गोळ्यांनी दारू आणि गांजाची जागा घेतली आहे. त्या एलएसडी आणि एमडीएमए पेक्षा खूपच स्वस्त आहे. त्यामुळे तरूण मोठ्याप्रमाणात त्याचे व्यसन करत असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

बेंझोडायझेपिन औषधांच्या श्रेणी अंतर्गत येणाऱ्या या गोळ्या चिंता, निद्रानाश आणि दारूचे व्यसन सोडवण्यासाठी वापरले जाते. पण नायट्राझेपामचा सतत गैरवापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याामुळे मृत्यूही होऊ शकतो. या गोळीचा १० रुपये दर आहे. पण तस्कर काळ्याबाजारात ५० ते १०० रुपयांना एक गोळी विकतात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT