bhiwandi news  Saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Nizampur Municipal Corporation : भिवंडी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? मुस्लिम मते गेमचेंजर ठरणार

Bhiwandi Nizampur Municipal Corporation update : भिवंडी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या महापालिकेत मुस्लिम मते गेमचेंजर ठरणार आहेत.

Vishal Gangurde

भिवंडी महापालिकेवर सत्तेसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी

मुस्लिम मते निवडणुकीत निर्णायक ठरणार

2017 मध्ये काँग्रेसने मिळवल्या होत्या सर्वाधिक जागा

काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), समाजवादी पक्ष आणि कोणार्क आघाडी यांच्यात काटे की टक्कर

फैय्याज शेख, साम टीव्ही

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातही निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गेल्या ३ वर्षांहून अधिक प्रशासनाचं राज्य असलेल्या भिवंडी महापालिकेतील राजकीय नेत्यांनी निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका म्हणजे भिवंडी आणि निजामपूर या दोन्ही शहरावर कोणाची सत्ता येणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

भिवंडी महानगरपालिका निवडणूक मागच्या वेळी 2017 साली पार पडली. यावेळी काँग्रेस,भाजप , शिवसेना, समाजवादी पार्टी, कोणार्क आघाडी आणि अपक्ष असे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या 2017 सालच्या निवडणुकीत सर्वात जास्त म्हणजे काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले होते. काँग्रेस पक्षाचे महापालिकेत ४७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं.

या निवडणुकीत भाजपचे 19 , तत्कालीन शिवसेना, 12 समाजवादी पार्टी 2, कोणार्क आघाडी 4 तर अपक्ष 6 उमेदवार निवडून आले होते. यामुळे भिवंडीच्या महापालिकेवर काँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर अशी आघाडी करून महापालिकाचा कारभार चालवला होता.

पुढे अडीच वर्षानंतर काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर भाजप आणि कोणार्क आघाडी यांची युती झाली. दोघांच्या युतीनंतर कोणार्क आघाडीचा महापौर झाला होता. यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी झाल्या. शिवसेना फुटीनंतर भिवंडीतील सर्व नगरसेवक शिंदे गटात गेले. या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी असी युती होईल किंवा नाही हे सांगू शकत नाही. मात्र भिवंडी महानगरपालिकेत मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा फायदा येत्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

सध्याचे आमदार कोण?

भिवंडी पूर्व विधानसभा : रईस शेख (समाजवादी पक्ष)

भिवंडी पश्चिम विधानसभा : महेश चौगुले (भाजप)

भिवंडी ग्रामीण विधानसभा : शांताराम मोरे (शिंदे गट)

तिन्ही विधानसभा मतदारसंघ महानगरपालिकेच्या प्रशासनात येतात. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या भूमिका, स्थानिक पातळीवर त्यांची पकड महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर भिवंडीतील काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मात्र भिवंडी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे काँग्रेस भिवंडीत पुन्हा जोरदार मुसंडी मारेल का, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Flood: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची मोठी घोषणा; आमदार-खासदार देणार 1 महिन्याचा पगार

Makhana Ladoo Recipe : एनर्जीचा सुपर डोस, रोज नाश्त्याला खा एक मखाना लाडू

Maharashtra Live News Update: बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार

Shocking : पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा घात झाला; आमदारी पॉईंटवरून पडून मृत्यू

CIBIL Score: सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स करा फॉलो, कर्ज मिळेल झटक्यात

SCROLL FOR NEXT