Bhima Koregaon Case Will vernon gonsalves arun ferreira be released from taloja jail today  Saam TV
मुंबई/पुणे

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरण; व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा आज जेलमधून सुटणार

Bhima Koregaon case: भीमा-कोरेगाव येथील एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांची आज जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bhima Koregaon case: भीमा-कोरेगाव येथील एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांची आज जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने दोघांनाही २९ जुलै रोजी सशर्त जामीन दिला होता. त्यामुळे आज दोघांचीही नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटका होणार असल्याची माहिती आहे.

पुण्यातील भीमा कोरेगाव येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या ‘एल्गार परिषदे’ला माओवाद्यांनी निधीपुरवठा केला होता, असा आरोप पुणे पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर ठेवला आहे. त्याचबरोबर एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे दंगल उसळली होती, असाही आरोप पोलिसांनी दोघांवर केला आहे.

व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा या दोघांनाही २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. सुरूवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोघांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

पण त्यांना तिथे कोणताही दिलासा मिळाला नव्हता. अखेर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. २९ जुलैला कोर्टाने दोघांनाही जामीन दिला होता. दरम्यान, जामीनानंतर आज दोघांचीही तळोजा तुरूंगातून सुटका होणार असल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षकांच्या वेतनात बदल, साताऱ्यात होणार IT पार्क; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Smartphone 2026: 6500mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर; दमदार फिचर्ससह Motorola Edge 70 Pro लाँच, किंमत वाचा

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Riteish and Genelia: 'लालपरी'ला नवं ग्लॅमर! रितेशभाऊ अन् जिनिलिया वहिनी MSRTC चे नवे ब्रँड अॅम्बेसिडर

Beed : बीडमध्ये संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीचा बालविवाह, ६ महिन्यांच्या गरोदर पीडितेचा जबरदस्ती गर्भपात

SCROLL FOR NEXT