Bhayandar News Saamtv
मुंबई/पुणे

Bhayandar News: अमानुषतेचा कळस! संडे मंडेची स्पेलिंग येत नसल्याने ६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण; पोलिसांत तक्रार दाखल

Bhayanar Crime News: लाकडी काठीने पाठीवर हातावर डोक्यावर मारले असून मोठ्या प्रमाणात पाठीवर वळ आले आहेत.

चेतन इंगळे

Bhayandar News: संडे मंडेची स्पेलिंग येत नाही" म्हणून सहा वर्षीय मुलास शिक्षिकेकडून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. मुलाला वळ उटेपर्यंत मारहाण केल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी सदर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंटराव पाटील यांनी दिली आहे. (Student Beaten By Teacher)

याबाबत अधिक माहिती अशी की, भाईंदर (Bhayandar) पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये राहणारे कल्पना निशात यांचा मुलगा जेएच पोद्दार भाईंदर पश्चिम या शाळेत सिनियर केजीमध्ये शिक्षण घेत आहे. सध्या शाळेला सुट्टी पडल्याने कल्पना निशाद यांनी त्यांच्या सहा वर्षीय मुलाला परिसरात असलेल्या प्रतिमा प्रजापती यांच्याकडे क्लासेसला पाठवत होते.

दिनांक ११ मे रोजी साडेदहाच्या सुमारास कल्पना निशाद यांचा मुलगा (वय, ६) हा रडत रडत घरी आला. त्यावेळी त्याने शिक्षिका प्रतिमा यांनी मला "संडे मंडे मधील स्पेलिंग वाचता येत नाही" म्हणून खूप मारले असल्याची तक्रार पालकांकडे दिली. (Latest Marathi News)

पालकांनाही मुलाच्या अंगावर मारहाणीचे वळ उटल्याचे निदर्शनास आले. यामध्ये लाकडी काठीने पाठीवर हातावर डोक्यावर मारले असून मोठ्या प्रमाणात पाठीवर वळ आले आहेत. या प्रकरणात पालकांनी तात्काळ भाईंदर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार नोंदवून संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंटराव पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT