भावना गवळी पेचात; कंपनीच्या संचालकाला ED ने घेतले ताब्यात Saam Tv
मुंबई/पुणे

भावना गवळी पेचात; कंपनीच्या संचालकाला ED ने घेतले ताब्यात

खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेच्या Siivsena खासदार भावना गवळी Bhavna Gavali या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आज मंगळवारी मोठी कारवाई करत शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान saeed khan यांना मनी लाँडरिंग Money laundering प्रकरणात अटक केली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने भावना गवळी 5 ठिकाणी छापे टाकले.

ईडीचा हा छापा 100 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून करण्यात आला. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर 30 ऑगस्टला ईडीने ED छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी Raid करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड Balaji Particle Board या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत.

सूचना न देता केलेली कारवाई;

पण भावना गवळीने ईडीच्या छाप्यांवर आपली प्रतिक्रिया देताना, नोटीस न देता त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे म्हटले आहे. भावना गवळी यांनी आरोप केला की, ईडीची ही कारवाई भाजपच्या सांगण्यावरून केली जात आहे. असे त्यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT