Prashant Surve joins Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: भावना गवळींचे घटस्फोटीत पती शिवसेनेत; प्रशांत सुर्वेंना उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Prashant Surve joins Shivsena |यापुढे ते जे काही जबाबदारी देतील ती मी पार पाडेन असं प्रशांत सुर्वे यावेळी म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई: शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोर खासदार भावना गवळी (Bhavna Gavali) यांनी शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला होता. त्यानंतर शिवसेनेने भावना गवळींची हकालपट्टी करत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाश सुर्वे यांनी शिवबंधन हाती बांधले. (Prakash Surve Latest News)

हे देखील पाहा -

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन - प्रशांत सुर्वे

यावेळी प्रशांत सुर्वे म्हणाले की, सर्व्हिसमध्ये असताना कधी सक्रिय होऊ शकलो नाही. सध्या खूप सारे लोकं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नेतृत्वं झुगारुन दुसरीकडे गेले. तर मला आज वाटलं की आपण फुला नाही फुलाची पाकळी बनून साहेबांच्या शिवसेनेत सामील व्हावं. यापुढे ते जे काही जबाबदारी देतील ती मी पार पाडेन असं प्रशांत सुर्वे यावेळी म्हणाले. प्रशांत सुर्वे हे पेशाने पायलट होते. २०१३ साली खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा घटस्फोट झाला होता.

१७ जुलैला शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची लोकसभेत शिंदे गटाच्या प्रदोतपदी निवड करण्यात आली होती. भावना गवळी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेला यांना धक्का बसला होता. त्यामुळे यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला खिंडार पडली होती. बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत भावना गवळींनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT