भावना गवळी हाजिर हो! आज ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश Saam Tv
मुंबई/पुणे

भावना गवळी हाजिर हो! आज ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडने गवळी यांना आज चौकशीसाठी बोलवले आहे. भावना गवळी यांच्यावर बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले आहेत. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

हे देखील पहा -

भावना गवळी यांच्याशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार खुद्द भावना गवळी यांनी केली होती. गवळी यांच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. तेव्हापासून ईडीच्या कारवाईला वेग आला आहे.

गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अलीकडेच ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता ईडीने गवळी यांना समन्स बजावले आहे. यापूर्वी गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी ईडीने समन्स बजावले आले होते. त्यावेळी गवळी यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली असल्याने ईडीने दुसऱ्यांदा गवळी यांना समन्स पाठवले आहे. या समन्सला भावना गवळी कसा प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागलेले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT