Bhandara News Saam TV
मुंबई/पुणे

Bhandara Tragedy News : प्रेमविरहामुळे विहिरीत उडी घेत तरुणीची आत्महत्या; घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Girl Ended Life For Love: तई खुर्द येथील रहिवासी असलेली प्रांजली कोल्हे ही आपल्या आईसोबत घरी दोन दिवसांपूर्वी रात्री झोपली होती. १२ जानेवारी रोजी रात्री आईला झोपेत पाहून प्रांजली दबक्या पावलांनी घरातून निघून गेली.

Ruchika Jadhav

शुभम देशमुख

Bhandara:

भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विरहातून एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून तरुणी बेपत्ता होती. अखेर गावातीलच राम मंदिराच्या लगत असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आज सापडला. प्रांजली (वय 20 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे.

दरम्यान प्रेम विरहातून तरुणीने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली असल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. तई खुर्द येथील रहिवासी असलेली प्रांजली कोल्हे ही आपल्या आईसोबत घरी दोन दिवसांपूर्वी रात्री झोपली होती. १२ जानेवारी रोजी रात्री आईला झोपेत पाहून प्रांजली दबक्या पावलांनी घरातून निघून गेली.

सकाळी आई झोपेतून उठली त्यावेळी मुलगी घरी नसल्याचं तिला समजलं. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मात्र तिचा काहीच पत्ता न लागल्याने पालांदुर् पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान पालांदुर पोलिसांनीही सदर बेपत्ता तरुणीचा शोध घेत तपास सुरू ठेवला.

आज रविवारी सकाळी प्रांजलीचा मृतदेह तई बूज येथील राम मंदिराच्या लगत असलेल्या विहिरीत तरंगताना आढलून आला. सदर घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली. पालांडुर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चाहांदे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे.

दरम्यान,घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली असता सदर मृतक तरुणीचे एका मुलासोबत प्रेम जुळले होते. मात्र प्रियकर असलेल्या मुलाचा काही दिवसांपूर्वी एका आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे प्रेमविरहात प्रांजलीने विहिरीत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली, असल्याची चर्चा आहे.पाळांदुर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT