Maharashtra Congress Saam Tv
मुंबई/पुणे

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी यादी जाहीर; 'या' दोन नेत्यांना मिळणार संधी

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विधान परिषदेच्या सहा जागा लढवणार आहे. प्रत्येक पक्षाला दोन जागा मिळणार आहेत. आज शिवसेनेकडून (Shivsena) दोन उमेदवार जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि हमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज काँग्रेसकडूनही दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसने (Congress) विधान परिषदेसाठी चंद्रकांत हांडोरे आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काल महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) नेत्यांनी विधान परिषदेसाठी बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी सहा जागा लढवणार असल्याचा निर्ण झाला. प्रत्येक पक्षाला दोन दोन जागा देण्यात आल्या आहेत.

विधान परिषदेसाठी आज महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकजून सचिन अहिर, हमशा पाडवी, तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकजूनही दोन नावे जाहीर केली आहेत. यात प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीची ती खेळी यशस्वी

राज्यसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करुन, आपण राज्यसभेची जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीला अपक्ष आमदारांचीही उपस्थिती होती.

२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT