Mumbai Best Bus Ticket Digital Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेस्ट बसची तिकिटे डिजिटल होणार, कोणत्या ॲपवर मिळणार? वाचा सविस्तर

Mumbai Best Bus Ticket Digital Update : मुंबईत BEST बस तिकिटे आता QR कोडच्या माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. Google Pay, PhonePe आणि WhatsApp सारख्या ॲप्सद्वारे तिकीट खरेदी करता येणार असून सुट्ट्या पैशांची कटकट संपणार आहे.

Alisha Khedekar

  • BEST बस तिकिटे आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध

  • QR कोडद्वारे मोबाईलवरून तिकीट खरेदी शक्य

  • Google Pay, PhonePe, Paytm, WhatsApp चा वापर

  • सुट्ट्या पैशांच्या त्रासाला पूर्णविराम

Mumbai Best Bus Ticket Now Available Digital App मुंबईच्या बेस्ट बसमधून प्रवास करताना कंडक्टरकडे तिकीट मागण्याची तसेच सुट्ट्या पैशांची कटकट आता संपली आहे. कारण बेस्ट आता बसची तिकिटे ऑनलाईन उपलब्ध करणार आहे. प्रवासी आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या (ONDC) माध्यमातून सहजपणे बसची तिकिटे खरेदी करू शकणार आहेत. या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांच्या मोबाईल ॲपवरून तिकिटे खरेदी करता येतील. शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

अधिकृत माहितीनुसार, बेस्टची डिजिटल तिकिटे खरेदी करण्यासाठी नवीन ॲप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. प्रवासी गूगल पे, फोनपे, पेटीएम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या लोकप्रिय ॲप्सचा वापर करू शकतील. सध्या, बेस्टच्या एकूण महसुलापैकी अंदाजे १५-१६% वाटा डिजिटल तिकीट प्रणालीचा आहे. ओएनडीसीसोबतच्या एकीकरणानंतर हा आकडा २५-३०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर डिझेल बेस्ट बसेस बंद करण्यात आल्या असून इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यात अनेक इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गूगल पे, व्हॉट्सॲप यांसारख्या नेहमीच्या वापरातील ॲप्सद्वारे तिकिटे खरेदी करणे प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरेल. तसेच सुट्ट्या पैशांसाठी होणारे वाद संपतील.

या उपक्रमाचा एक मोठा फायदा असा आहे की, भविष्यात बस, मेट्रो आणि रेल्वे यांसारख्या सेवा प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीने अधिक स्मार्ट, कनेक्टेड बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर

NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

Pune Crime: पुणे हादरले! आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, मुलीच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून जागीच संपवलं

Jio Recharge: 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत दिवसाला मिळेल 2GB डेटा, Jioचा जबरदस्त रिचार्ज प्लान

SCROLL FOR NEXT