Beed Gevrai Taluka News Saam TV
मुंबई/पुणे

Beed News: हृदयद्रावक! मेकअपचा आरसा अंगावर पडला; अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी अंत

Gevrai News: बीडच्या गेवराई तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे.

विनोद जिरे

Beed Gevrai Taluka News : बीडच्या गेवराई तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मेकअप आरसा अंगावर पडल्याने गळ्यात काच घुसून एका ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला आहे. आरोही गोपाल भिसे असं, मृत चिमुकलीचं नाव आहे. गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी गावात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास ५ वर्षीय चिमुकली आरोही ही घरात (Beed News) खेळत होती. यावेळी बाकीचे घरातली लोक इतर कामात व्यस्त होती. मात्र खेळता-खेळता सोप्यावर चढून बांगड्या ठेवताना, हातातल्या बांगड्या मेकअप आरश्याच्या हुकात गुंतल्या आणि आरोहीचा सोप्या वरचा पाय निसटला.

काही कळण्याच्या आतच मेकअपचा आरसा तिच्या अंगावर पडला. क्षणात आरशाच्या काचाचे तुकडे सर्वत्र झाले आणि त्यातील एक काचाचा तुकडा चिमुकल्या आरोहीच्या गळ्यात घुसला. यावेळी चिमुरडीचा आवाज ऐकून घरातील सर्वजण खोलीकडे पळाले, अन् गळ्यात घुसलेला तो काचाचा तुकडा काढण्याचा प्रयत्न केला. (Breaking Marathi News)

दरम्यान, आरोपीच्या कुटुंबियांनी तिला घेऊन तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र, वाटेतच आरोहीचा मृत्यू झाला. ५ वर्षीय आरोहीचा अचानक असा मृत्यू झाल्याने भिसे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने खेर्डावाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Relationship: लग्नानंतर तुमच्यावरील प्रेम कमी झालं? नेहमी बोला फक्त 'ही' गोष्ट; नवरा दररोज घेईल मिठीत

SCROLL FOR NEXT