Crime News Saam tv
मुंबई/पुणे

रूम भाड्याने दिला नाही म्हणून वृद्ध महिलेला मारहाण; दोघांना बेड्या

आरोपींकडून गावठी पिस्तुल आणि सुरा हस्तगत

अजय दुधाणे

उल्हासनगर - रूम भाड्याने दिला नाही म्हणून वृद्ध मालकिणीसह तिच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि एक सुरा हस्तगत करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील साधुबेला शाळेजवळ उषा सुरेंद्र सिंग या वास्तव्याला आहेत. त्यांच्या घराच्या बाजूलाच अजय पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण वास्तव्याला आहे. उषा सिंग यांचं घर दुमजली असून त्यांच्या घराच्या वरचा मजला अजय याला भाड्याने हवा होता. मात्र उषा यांनी त्याला घर भाड्याने देण्यास नकार दिला.

हे देखील पाहा -

याचाच राग मनात धरून अजय आणि त्याच्या इतर ३ साथीदारांनी आधी उषा यांचा मुलगा शिवजीत याला मारहाण केली होती. यानंतर पुन्हा अजय आणि त्याचा मित्र अमित माखिजा यांनी उषा यांच्यासह त्यांचा मुलगा इंद्रजित याला मारहाण केली.

या दोन्ही गुन्ह्यात पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच हे दोघे नेहरू नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगझडतीत एक देशी पिस्तुल, एक जिवंत राऊंड, एक सुरा पोलिसांनी जप्त केला.

दरम्यान, अटक करण्यात आलेले अजय पवार आणि अमित माखिजा हे दोघेही रेकॉर्डवरील गुंड आहेत. या दोघांनाही २०२० साली तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर सलग दोन मारहाणीच्या केसेस, अवैध बंदूक आणि शस्त्र बाळगणे अशा केसेस झाल्यानं दोघांनाही स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हतबल शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी

EPFO ची मोठी घोषणा! लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी काढता येणार भरघोस रक्कम; पाहा A to Z प्रक्रिया

Congress party joining: काँग्रेसच्या गोटात मोठी एन्ट्री; माजी IAS अधिकारी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पक्षात दाखल

Manchow soup Recipe: रेस्टॉरंटसारखा चटपटीत मन्चाव सूप घरी बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Gold Rate Today : गणेशोत्सवापूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; १ तोळ सोने इतक्या रुपयांनी महागलं; जाणून घ्या आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT