Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Barsu Refinery Project: 'पोलिस बळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका', बारसू रिफायनरीवरुन अजित पवार संतप्त

Latest News: या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

Priya More

Mumbai News:कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलकांवर पोलिसांच्या (Ratnagiri Police) बळाचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

बारसू रिफायनरीवरुन सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतप्त झाले आहेत. यासंदर्भात अजित पवार यांनी ट्वीट करत त्यांनी 'पोलिस बळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका. हे सर्वेक्षण स्थगित करावे', असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

अजित पवार यांनी बारसू रिफायनरीसंदर्भात ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी खारघरच्या घटनेचा उल्लेख करत अजित पवार यांनी सरकारला विनंती केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.',

तसंच हे सर्वेक्षण स्थगित करावे अशी देखील मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.' हे ट्वीट करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या प्रकल्पाला विरोध करत रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सर्वेक्षणाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही आणि सर्वेक्षण करुन देणार नाही ही ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT