Abhijit Bichukale Baramati  Saam
मुंबई/पुणे

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! 'बिग बॉस' फेम बिचुकले मैदानात; थेट सुनेत्रा पवारांना देणार आव्हान

Baramati election latest news : बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आतापर्यंत १९ उमेदवारांनी अर्ज केले असून निवडणुकीत चुरस वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Abhijit Bichukale Baramati bypoll nomination details : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी अर्ज दाखल केला आहे. अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आतापर्यंत १९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये अभिजीत बिचुकले यांचाही समावेश आहे.

निवडणूक का लढवतो आहे? याबाबत सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याची माहिती अभिजित बिचुकले यांनी दिली आहे. अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत विविध निवडणुका लढवल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघातून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. सातारा येथूनही त्यांनी अर्ज भरला होता.

२०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यासाठी किमान १०० आमदारांच्या स्वाक्षरी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही ते अनेकदा उभे राहिले आहेत.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत कुणी कुणी केला अर्ज? संपूर्ण यादी

  • सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी )

  • सागर भिसे ( अपक्ष )

  • अभिजीत बिचुकले ( अपक्ष )

  • राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )

  • गजानन गवळी ( अपक्ष )

  • त्रिशाला कांबळे ( अपक्ष )

  • दिलीप अळोणी ( अपक्ष )

  • दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )

  • अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )

  • सागर भिसे ( अपक्ष )

  • रजाक मुलाणी ( अपक्ष )

  • संदीप खरात ( अपक्ष )

  • विलास होळकर ( अपक्ष, बारामती )

  • दादा थोरात ( अपक्ष, बारामती )

  • अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )

  • मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )

  • अभिजीत बिचुकले ( अपक्ष )

  • अनिल तुपे ( अपक्ष )

  • संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT