BAR​​AMATI ATTACK: RANA DILIP SURYAWANSHI INJURED saam tv
मुंबई/पुणे

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Baramati Businessman Rana Dilip Suryawanshi Attacked Near Airport: बारामती विमानतळाजवळ राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले.

Omkar Sonawane

मंगेश कचरे, साम टीव्ही

बारामतीमध्ये राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बारामती विमानतळाजवळ रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात राणा सूर्यवंशी जखमी झाले असून, त्यांना सुरुवातीला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर बारामती विमानतळाजवळ हल्ला करण्यात आला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आलं. त्यांनी पांढरा कुर्ता हा परिधान केला असून तो संपूर्णपने रक्ताने माखलेला दिसून येत आहे.

राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोण आहे, हल्ला नेमका कशामुळे झाला आणि या घटनेत किती जणांचा सहभाग आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेनंतर रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिस तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.

यापूर्वीही हल्ला झाल्याची माहिती

राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आधीच्या घटनेचा तपशील, सध्याच्या हल्ल्याशी त्याचा काही संबंध आहे का आणि या हल्ल्यामागे नेमकं काय कारण आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT