Thane Banner War Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Banner War: ठाण्यात पुन्हा एकदा बॅनर वॉर; शिवसेना शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा

ठाण्यातील कळवा नाका परिसरात पुन्हा एकदा बॅनर वॉर

Shivani Tichkule

कल्पेश गोर्डे

Thane News: ठाण्यातील कळवा नाका परिसरात पुन्हा एकदा बॅनर वॉर सुरू झालेला पाहायला मिळालं आहे. या बॅनरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनरवर धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटोसहीत मजकूर लिहिलण्यात आला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या वरून सुरु असलेल्या वादातून हे बॅनर लावण्यात आले बॅनर आहेत. (Latest Marathi News)

सुरक्षा कमी करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारख्या दरारा असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भीती दाखवायचा निष्कळ प्रयत्न करणारे पळपुटे तुम्ही...साहेबांना जामीन देणारे कोण? धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी मदत (ती ही तुमच्याकडे?) मागितली असं बरळता? थुंकीविकास आघाडीचे थेंब आहात तुम्ही. आव्हाड छप्पराणे... बनायचा उद्धटपणा करू नये... असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी जामिनासाठी पवारांनी मदत केली, असं म्हटलं होत. पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होत.

काय म्हणाले होते नरेश म्हस्के?

जितेंद्र आव्हाड धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं, ते जरा भान ठेवून करा. ते आनंद दिघे बोलले त्यांना धर्मवीर बोलायला लाज वाटते का? शरद पवारांमुळे जमीन मिळाला असं म्हणता तर शरद पवार तेव्हा न्यायाधीश होते का? न्यायालय शरद पवार साहेब चालवत होते का ? शरद पवार साहेबांनीच आनंद दिघे यांना जेलमध्ये टाकलं होतं का? अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

SCROLL FOR NEXT