Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंचे 'ते' व्यंगचित्र झळकतय पुण्यात; बॅनरवरुन रंगलीय चर्चा

पुणेकरांनी लावले राज ठाकरे यांना त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे होर्डिंग्ज

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

प्राची कुलकर्णी

पुणे - राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर मिळालं आहेत. पुण्यात (Pune) जागोजागी ठाकरे यांनीच काढलेलं एक व्यंगचित्र झळकलेलं आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये हे होर्डिंग्ज लागले आहेत. अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव साहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिराला विरोध करूनव्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुवत असा मजकूर या होर्डिंग्जवर लिहण्यात आला आहे.

हे देखील पहा -

५ जुनला राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. त्याआधी पुणेकरांनी राज ठाकरे यांना त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे होर्डिंग्ज लावले आहे. या होर्डिंग्जवर उद्धवसाहेब म्हटलंय त्यामुळे हे होर्डिंग्ज शिवसेनेने लावले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सध्या राज ठाकरे यांनी राज्यात भोंग्यांचा मुद्दा उचलून पुन्हा एकदा ध्रुवीकरणाला जन्म घातल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांच्या या अजेंड्यावर अनेकांनी आरोप केले आहेत काहींनी त्यांना समर्थनही दर्शवलं आहे. मात्र पुण्यात सध्या बॅनर्सची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते ५ जुनला अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे पुण्यात लावलेले हे होर्डिंग्ज चर्चेचा विषय बनत आहे. हे होर्डिंग्ज कोणी लावले याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT