nihar thackeray news  saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बाळासाहेब यांचे नातू निहार ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चांना उधाण

बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरे यांचे पुतणे, बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही राज्यातील राजकारण तापलेलचं आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात संघर्ष सुरूच आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरे यांचे पुतणे, बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. त्यामुळे निहार यांची भूमिका ही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( Maharashtra Political News In Marathi )

निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवर भाष्य करत भूमिका स्पष्ट केली. निहार ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेतील असा विश्वास आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना कायदेविषयक सल्ला किंवा मदत करेन. मी त्यांना आज शुभेच्छा द्यायला आलो. एकनाथ शिंदे हे आपलेच नेते आहेत'. खरी शिवसेना कोणती ? पत्रकाराच्या या प्रश्नावर भाष्य करताना निहार म्हणाले, खरी शिवसेना ती जी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेईल'. निहार पुढे म्हणाले, 'शिवसेनेला आव्हानं नवीन नाहीत. अनेक पक्षात लिगल फर्म असतो, ती मदत मी करणार आहे'

निहार ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ' स्मिता ठाकरे यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. त्यांना मला भेटून आनंद झाला. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे जात आहे, त्याचे समर्थन त्यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर आज निहार ठाकरे देखील मला भेटले. त्यांनी देखील सदिच्छा भेट घेतली आहे. त्यांनाही एक समाधान वाटलं. त्यांनी त्यांच्या बोलण्यातून समाधान व्यक्त केलं. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे त्यांनी आमच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. ही केवळ सदिच्छा भेट होती'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT