Badlapur tragedy: 24-year-old youth dies by suicide after alleged phone argument, leaving his fruit-seller mother devastated. saam tv
मुंबई/पुणे

आई बाजारात फळं विकत राहिली अन् तिकडे एकुलत्या एक मुलानं घेतलेली एक्झिट... बदलापूर हादरलं

24 Year Old Youth Endlife In Badlapur After Phone Argument: बदलापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातील वादानंतर २४ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पोलिस तपास सुरू आहे.

Mayuresh Kadav

बदलापूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका फळविक्रेत्या महिलेच्या एकुलत्या एका मुलाने गुरुवारी रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. प्रेमप्रकरणातील वादानंतर या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल दाते असे या आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. विशालची आई बदलापुरातील नवरत्न हॉटेल परिसरात फलविक्री करून कुटुंबाचा गाडा चालवते. गुरुवारी दुपारी विशालचा फोनवर कुणाशी तरी जोरदार वाद झाला होता. या वादानंतर तो प्रचंड रागाच्या भरात घरातून निघून गेला.

मुलाचा राग आणि तो अचानक निघून गेल्याने काळजीपोटी कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र काही वेळातच विशालने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. विशालच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून, तो त्याच्या आईचा एकमेव आधार होता. एकुलत्या एक मुलाचा आधार हरपल्याने महिलेवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून आत्महत्या करण्यापूर्वी फोनवर कोणाशी वाद झाला होता, याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावच्या गिरणा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Weight loss walking tips: एका आठवड्यात 1 किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती पावलं चालावं?

Child Health : तुमचं मूल वयापेक्षा मोठं दिसतंय? असू शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच करा उपाय

Elaichi banana : आकाराने छोटी पण गुणांनी भारी! इलायची केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर असीम सरोदेंचा सर्वात मोठा दावा

SCROLL FOR NEXT