Badlapur Ring Road Cleared as MMRDA & Civic Body Demolish 65+ Illegal Structures saam tv
मुंबई/पुणे

Badlapur News : बदलापुरात रखडलेला 'रिंगरोड'अखेर मोकळा; ६५ हून अधिक अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

Badlapur Ring Road Cleared : बदलापूर शहरातील बहुप्रतिक्षित रिंगरोडच्या मार्गातील अडथळा दूर झाला असून, नगरपरिषदेने माणकिवली परिसरात ६० ते ६५ अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत पनवेल हायवे थेट कल्याण-कर्जत राज्य महामार्गाला जोडणारा मार्ग मोकळा केला आहे.

Mayuresh Kadav

बदलापूर शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रिंगरोडच्या मार्गातील अडथळा अखेर दूर झाला आहे. बदलापूर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने माणकिवली परिसरात धडक मोहीम राबवत ६० ते ६५ अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. चार जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे पनवेल हायवे आता थेट माणकिवली मार्गे कल्याण-कर्जत राज्य महामार्गाला जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका

बदलापुरातील कात्रप भागात राज्य महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पनवेल हायवे माणकिवली मार्गे खरवईजवळ कल्याण-कर्जत हायवेला आणि दहिवलीमार्गे जेएनपीटी हायवेला जोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, अवघ्या २०० मीटरच्या मार्गात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असल्याने रिंगरोडचा प्रश्न रखडला होता.

Badlapur ring road project

अखेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ही धडक कारवाई केली. या मोहिमेत चार ते पाच चाळी आणि सहा व्यावसायिक गाळ्यांसह अनेक अडथळे भुईसपाट करण्यात आले. येत्या दोन दिवसांत उर्वरित अनधिकृत बांधकामांवरही कारवाई केली जाणार आहे.

Badlapur ring road clearance status and road widening updates

दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होणार

मॅकडी चौक ते खरवई दरम्यानच्या रिंगरोडचे काम प्रलंबित होते. हा रस्ता पूर्ण झाल्यास शहरातील ट्रॅफिकचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे होईल. आज ६० ते ६५ अतिक्रमणांवर कारवाई झाली असून पुढील दोन दिवसांत २०० मीटर रस्त्यामधील सर्व अनधिकृत बांधकामे हटवली जातील.

Badlapur ring road anti encroachment demolition drive details

५ ते ६ जुन्या घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज होईल. या कारवाईमुळे बदलापूरकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार असून, येत्या काही महिन्यांत शहराच्या मोठी सुधारणा पाहायला मिळेल. असा विश्वास मुख्याधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Jalgaon: मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला नवं वळण; अमेरिका कनेक्शन समोर

कल्याणमध्ये सफाई कामगारांचा एल्गार! ५६ कामगारांना कामावरून कमी केल्याने केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या

हातात बेड्या, आता अंगावर खाकी! जेलमध्ये राहून MPPSC परीक्षा दिली; थेट DSP पदाला गवसणी

IND vs NZ 1st T20I Today Cricket : पहिल्या टी २० मध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय; नमन- संजू ठरले विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT