badlapur  Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे अश्लील चाळे

badlapur Crime News : बदलापूरकरांना पुन्हा हादरवणारी घटना घडली आहे. बदलापुरात ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याने अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. बदलापुरातील घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mayuresh Kadav

Badlapur News : बदलापुरात पुन्हा खळबळजनक घटना घडली आहे. बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीसोबत अश्लील चाळे झाल्याची घटना घडली आहे. बदलापूरच्या एरंजाड गावातील ६ वर्षीय चिमुकलीसोबत हा संतापजनक प्रकार घडला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एरंजाड गावात १४ जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याची घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या १६ वर्षीय युवकाने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. या मुलाने खेळण्याच्या बहाण्याने कडेवर घेत बसस्टॉप शेजारील निर्जन ठिकाणी नेलं. त्यानंतर तिच्या तिच्याशी अश्लील चाळे केले.

मुलगी रडू लागल्यानं त्याने तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी मुलगी घाबरलेली मुलगी शाळेत जायला तयार नव्हती. त्यानंतर तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारलं. त्यानंतर शेजारच्या दादाने काल काय केलं, ते तिनं सांगितलं. यानंतर मुलीच्या आईने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो आणि अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्याची 14 दिवसांसाठी भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली. या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जाते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका शाळेत दोन चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याच प्रकरणातील आरोपी एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT