Badlapur Karjat Railway Line 
मुंबई/पुणे

बदलापूर-कर्जत अन् कल्याण-कसारा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार? डोंबिवलीतील 'त्या' बैठकीत काय ठरलं?

Badlapur Karjat Railway Line : डोंबिवलीतील बैठकीत मुंबई-ठाणे रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. बदलापूर-कर्जत आणि कल्याण-कसारा तिसरी-चौथी रेल्वे लाईन, कळवा-ऐरोली लिंक, शटल सेवा आणि थेट कनेक्टिव्हिटीच्या मागण्या मांडण्यात आल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे-मुंबई परिसरातील रेल्वे प्रवासी संघटनांच्या ४८ संघटनांच्या प्रतिनिधींची भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची डोंबिवली जिमखाना येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता, सुरक्षितता आणि थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासह प्रवाशांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रवासी संघटनांनी यावेळी कळवा–ऐरोली रेल्वे लिंक तातडीने पूर्ण करणे, बदलापूर–कर्जत तसेच कल्याण–कसारा मार्गावरील ३री व ४थी रेल्वे लाईन प्रकल्पांना गती देणे, ठाणे–कर्जत/कसारा शटल सेवा सुरू करणे, आधुनिक सिग्नलिंग प्रणालीद्वारे लोकलमधील हेडवे कमी करणे, दिवा–वसई–पनवेल थेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि कल्याण जंक्शनसह सीएसएमटीपर्यंतच्या रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे आदी मागण्या मांडल्या.

या मागण्यांसंदर्भातील सविस्तर निवेदन स्वीकारत रविंद्र चव्हाण यांनी चर्चेस सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. प्रवाशांच्या प्रश्नांबाबत शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवाशांना अधिक सुरक्षित व थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देणे यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, भालचंद्र लोहकरे, नवरे काका, मधुताई कोटियन, लताताई आरगडे, नंदकुमार देशमुख, अनिताताई, वंदनाताई सोनवणे, सिद्धेश देसाई, अनिकेत घमंडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijaydurg Fort : समुद्राच्या पोटात दडलंय विजयदुर्गचं गूढ रहस्य, ९९% लोकांना माहित नसेल

पोलिस विभागात मोठे खांदेपालट! 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांचं गृह विभागात ऑपरेशन

Velchi Khanyache Fayde: 30 दिवस रोज एक वेलची खाल्ल्याने काय होतो फायदा?

Maharashtra News Live Update: मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कवर एल्गार; CJP चे पोलिसांना थेट पत्र

Walking Benefits: लिम्फॅटिक वॉक केल्याने पायाची सूज आणि ब्लोटिंग कमी होतं का? जाणून घ्या ७ फायदे

SCROLL FOR NEXT