Badlapur Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Metro: बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका; मेट्रो 14 ची निविदा निघाली; खर्च किती?

Kanjurmarg-Badlapur Metro Line 14: बदलापूरकरांचा प्रवास आता आणखी सोपा होणार आहे. बदलापूरकर-कांजुरमार्ग मेट्रोचं काम लवकरच सुरु होणार आहे.

Siddhi Hande

बदलापुरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच कांजुरमार्ग बदलापूर मेट्रोचं काम सुरु होणार आहे. यासाठी मेट्रो १४ची निविदादेखील निघाली आहे. यामुळे बदलापुरकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यांचा प्रवास गारेगार होणार आहे. या वर्षी या मेट्रोचं काम सुरु होईल, असं सांगण्यात आलं आहे.

मेट्रो १४ची निविदा निघाली (Kanjurmarg- Badlapur Metro 14 )

मुरबाडचे आमदार किसन कचोरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार आहे. कारण मेट्रो 14 च्या कामाची निविदा निघाली आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर लवकरच ही मेट्रो धावणार आहे.या मेट्रोचा मार्ग 38 किमी लांबीचा असून लवकरच या मार्गिकेचं काम सुरू होणार आहे अशी माहिती बदलापूरच्या माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली.

बदलापूर-मुंबई जोडलं जाणार (Badlapur-Mumbai Metro)

मेट्रो 14 मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका सुरू झाली की दररोज 7 लाख प्रवाशांची ये-जा शक्य असेल. खाडीपार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल. या मेट्रोवर 15 स्थानके त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे.बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल.

वाहतूक कोंडी फुटणार

मेट्रो १४ मुळे बदलापूर आणि मुंबई जोडली जाणार आहे.यामुळे प्रवाशांचा तब्बल दीड ते दोन तासांचा प्रवास वाचणार आहे. सध्या बदलापूरवरुन येताना प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोडींचीही समस्या आहे. अशा परिस्थितीत जर मेट्रो सुरु झाली तर प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT