Badlapur Firing Update Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Firing Update : बदलापूर गोळीबार घटनेचा अवघ्या काही तासांत उलगडा, थरारक घटनेमागची Inside Story

Badlpaur firing Inside Story : बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतलं. बदलापूर गोळीबार घटनेचा अवघ्या काही तासांत उलगडा झाला आहे. या थरारक घटनेमागची Inside Story समोर आली आहे.

अजय दुधाणे

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सांयकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली. भर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींचा तपास करण्यात सुरुवात केली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या कारवाईनंतर अवघ्या काहीत तासांत घटनेचा उलगडला झाला आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. रेल्वे स्ठानकावर झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोळीबारात जखमी झालेल्या विकासला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णालयात पगारेवर प्राथमिक उपचार सुरु आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनी तातडीने गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याजवळील बंदूक जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

दरम्यान, पुण्यानंतर आता बदलापुरात गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे बोललं जात आहे. गर्दीच्या ठिकाणीच गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बदलापूरमधील घटनेनंतर पोलिसांकडून काय कारवाई केले जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT