Badlapur Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशयांची तस्करी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; ३ महिलांना अटक

Badlapur Crime News : बदलापूरमध्ये गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून अंडाशय काढून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी तीन महिलांना अटक करून मोठ्या रॅकेटचा तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचे धक्कादायक रॅकेट उघड

  • पैशांचे आमिष दाखवून महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया

  • पोलिसांनी तीन महिलांना अटक करून पुरावे जप्त केले

  • पोलीस तपास सुरू

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.

बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं.

त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT