Baba Siddique Shot Dead Saam TV
मुंबई/पुणे

Baba Siddique Death : हीच ती जागा, जिथे बाबा सिद्धीकींवर झाला गोळीबार; थरारक VIDEO आला समोर

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्धीकींवर ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथला व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

Satish Daud

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची काल शनिवारी (ता. १३) रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या केली. वांद्रे परिसरात तीन आरोपींनी बाबा सिद्धीकी यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सिद्धीकी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळ हळहळलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

दरम्यान, हा थरार ज्या जागेवर घडला, तिथला व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर वांद्रेतील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळीबार झाला हल्ला झाला. धक्कादायक बाब म्हणजे तेथील पथदिवे देखील बंद होते. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून निघाले होते. त्यावेळी तिघांनी दोन बंदुकीतून एकूण ६ गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या सिद्धीकी यांच्या छातीत घुसल्या. तर एक गोळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागली. याशिवाय दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या.

बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. त्यामुळे आरोपींकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गोळीबारानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, यातील दोघांना जमावाने पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

गोळीबारानंतर पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळावर एक पिस्तुल आणि गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणारा एक आरोपी हा हरियाणा आणि दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत पोलिसावर हल्ला, मद्यधुंद तरुणाने शिवीगाळ करत केली मारहाण

Dhurandhar : 'धुरंधर'साठी प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाले तब्बल १ कोटी? VIDEO शेअर करत म्हणाला- "सगळे पैसे संपले..."

Maharashtra News Live Update: महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड

RBI UPI Rules: UPI पेमेंटसाठी RBI कडून ४ मोठे बदल, PhonePe अन् Google Pay वरून पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी वाचा

Clove Water Benefits: 30 दिवस सकाळी प्या 'हे' पाणी, पचनक्रिया सुधारेल आणि वजनही होईल कमी

SCROLL FOR NEXT