Baba Siddique Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Baba Siddique Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात

Lawrence Bishnois: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात असल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. गुन्हे शाखा मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात असल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. गुन्हे शाखा मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे. याप्रकरणात पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीमधून तो अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुजीत सुशील सिंह याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सुजीत सिंह कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणात अनमोल बिष्णोईला आरोपी करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सुजीत सिंहच्या सांगण्यावरून याप्रकरणातील अटक आरोपी नितीन सप्रे आणि राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची रेकी केली होती.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३२ वर्षीय सुजीत सिंहला अटक केली आहे. त्याने परदेशातील गुंडांसोबत संपर्क साधला होता. सुजीत सिंह विविध समाज माध्यमातून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. पंजाब पोलिस आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सुजीत सिंहला लुधियानातून अटक करण्यात आली होती. सुजीत सिंह बाबा सिद्दिकीला मारण्याच्या कटात सहभागी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

Virar Picnic Spot : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

SCROLL FOR NEXT