Ayodhya Poul News Saam Tv
मुंबई/पुणे

Ayodhya Poul News: ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर शाईफेक, घटनेनंतर अयोध्या पौळ यांची संतप्त प्रतिक्रिया

Political News Today: ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे.

Shivani Tichkule

Thane News Today: ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अयोध्या पोळ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी शाईफेकनंतरचे काही फोटोही पोस्ट केले. Latest Marathi News)

अयोध्या पौळ यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात एका महिलेवर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर अयोध्या पौळ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला बोलावण्यात आलं होतं. इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली. इथे आल्यावर बॅनर वेगळाच होता पण कार्यक्रमातून निघणं योग्य नसल्याने मी तिथे थांबले.

या कार्यक्रमात मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले आणि त्यावेळी एक महिला तिथे आली आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली, असं अयोध्या पौळ म्हणाल्या. (Thane News)

मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. हे सर्व षडयंत्र असून हा सर्व एका षडयंत्राचा भाग होता. षडयंत्र करूनच मला त्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. मी सातत्याने सोशल मीडियावर (Social Media) ठाकरे गटाची बाजू मांडत असते त्यामुळे मला टार्गेट करण्यात आलं. पण आम्ही अशा हल्ल्यांना घाबरत नाही. आम्ही आमचं काम सुरु ठेवणार, मी माझ्या पक्षाच्या अनेक कार्यक्रमाला गेले आहे. तेव्हा माझ्यासोबत अस काहीच घडलं नाही, असं अयोध्या पौळ यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत अयोध्या पौळ?

शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर अयोध्या पोळ या चर्चेत आल्या होत्या. अयोध्या पोळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या आहेत. अयोध्या यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात.

अयोध्या यांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT