मुंबई: मराठी (Marathi) भाषा भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमराठी अधिकाऱ्यांना टोला लगावला. राज्याच्या मराठी भाषा संवर्धनासाठी सगळेच प्रयत्न करत होते. पण त्यासाठी काही अडचणी येत होत्या. प्रत्येकवेळी नवीन प्रश्न निर्माण होतं होता. आज गुढी पाडवा आहे, या मुहूर्तावर मराठी भाषा भवन इमारतीचं भूमीपूजन होतं आहे, याचं मला समाधान होतं आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
मुंबईमध्ये (Mumbai) आलेल्या प्रत्येकाला मराठी (Mumbai) भाषा भवन पहायला मिळणार आहे, याच समाधानही मिळणार आहे. मुंबईमधील मरिन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी ही इमारत होणार आहे. मराठी भाषेला मोक्याची जागा मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मराठी भाषातील टोले आम्ही अनुभवले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मराठी भाषा वेगळी आहे. ते समोरच्याला हळूहळू गुदगुल्या करतात, असंही पवार म्हणाले.
मराठी भाषा (Marathi) कधीही संपणार नाही. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरीही तो मराठीतच बोलतो, त्यामुळे आपली भाषा कधीही संपणार नाही. मराठी भाषा भवनची नवी मुंबईत एक ब्रँच सुरु करण्याचा विचार आमचा विचार आहे. आज गुढी पाडव्या निमित्त विविध विभागाचे मुंबईमध्ये (Mumbai) कार्यक्रम होणार आहेत. दोन वर्षे आपली कोरोना काळात गेली आहेत. त्यावेळी आपण इमारतीसाठी अनेकांनी प्रझेंटेशन दिले आहेत. मराठी भाषा भवनची इमारत वेळेत पूर्ण होईल अशी आशा मी करतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
मराठी (Marathi) भाषेला अभिजात भाषा हा दर्जा द्यावा अशी मागणी आम्ही केंद्राला केली आहे. केंद्रानेही याबाबतील सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. आपली भाषा बहुज्ञात कशी होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषा फक्त ओठातून नको तर पोटातून यायला पाहिजे. भाषा ही उद्योगाची असली पाहिजे. आपल्याकडे इंग्रजी भाषा जास्त वापरली जाते हे कुठेतरी कमी झाले पाहिजे. आपल्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या घरातील कुटुंबीयांना मराठी वाचण्यास प्रोत्साहन केले पाहिजे, असा टोमणा अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमराठी अधिकाऱ्यांना लगावला.
Editeb By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.