>> प्राची कुलकर्णी
कोबाड गांधी लिखित आणि लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकाला शासनाकडून जाहीर झालेला पुरस्कार अचानकपणे रद्द करण्यात आला. पुरस्कार रद्द झाल्याने अनेक लेखकांकडून याचा निषेध करण्यात येत आहे. अनेकांना पुरस्कार परत केले तर अनेकांना शासनाच्या विविध समित्यांवरील पदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींनंतर कोबाड गांधी यांनी आपलं मत मांडलं आहे. (Latest Marathi News)
या संपूर्ण वादावर तुमची प्रतिक्रिया काय?
उत्तर – फ्रॅक्चर्ड फ्रिडमचे मुळ इंग्रजी पुस्तक हे मार्च २०२१ पासून अॅमेझाँन बेस्टसेलर राहिले आहे. सध्या सुरु असलेले सोशल मीडिया कॅम्पेन हे खोट्या दाव्यांनी भरलेले आहे आणि त्याच बरोबरच विपर्यासाने भरलेले आहे. माझ्या यापूर्वीच्या वक्तव्यांवरुन आणि आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाल्यावरुन हे सिद्ध होते आहे. पुस्तकात माओईस्ट तत्वज्ञानाचा काहीही उल्लेख नाही. पुस्तकातून इतकेच सूचीत करण्यात आले आहे की कुठल्याही सामाजिक प्रकल्पासाठी बदल अपेक्षित असेल तर अनुराधा तत्वज्ञानाचा (नैसर्गिकता, स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि साधेपणा) याचा अंगिकार सर्वांच्या आनंदासाठी करणं गरजेचं आहे.
त्याबरोबरच हा पुरस्कार हा भाषांतरासाठी दिला गेला होता. हे भाषांतर चांगल्या दर्जाचे असल्याचे यापूर्वीही अनेकांनी मला सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने अशा अपप्रचाराला बळी ठरून पुरस्कार रद्द केला हे दुर्देवी आहे. पण यामुळे पुस्तकाची किंवा भाषांतरकाराची कुठलीही क्षमता कमी होत नाही. त्यांनी केवळ त्यांच्या कामाचा भाग म्हणून प्रकाशकासाठी हे भाषांतर केले आहे. आणि त्यांचा चरितार्थ यावर अवलंबून असताना असा पुरस्कार नाकारणं हे योग्य नाही. (Marathi News)
तुम्ही नक्षली चळवळीला पाठिंबा देता असा आरोप आहे. यातून त्याचा प्रकार होईल असं म्हणलं जातंय. पण पुस्तकात तर तुमच्या झालेल्या भ्रमनिरासाबाबत तुम्ही लिहिलं आहे.
उत्तर- बरोबर आहे. मी नक्षली चळवळीबद्दल कधीत बोललो नाही. मी जगभरातल्या कम्युनिस्ट चळवळीबाबत भाष्य केलं आहे. माझ्या आयुष्यात मी डाव्या चळवळीचा ऱ्हास होताना पाहिला आहे. त्यामुळे अनुराधा मॉडेलच्या अंगिकाराबदद्ल मी आग्रही आहे.
तुमचा हा भ्रमनिरास माओवादी चळवळीबद्दल होता की फक्त भारतातल्या चळवळीबद्दल आणि नेत्यांबद्दल
उत्तर- पुस्तकात कुठेही मी माओवादी नेते किंवा माओवादी तत्वज्ञानाबाबत बोलत नाही. डाव्या चळवळीबाबत, कम्युनिझमबाबत मी भूमिका मांडली आहे.
या वादाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की यापुढे राज्यघटनेचा आदर न करणाऱ्यांना पुरस्कार दिला जाणार नाही. तुम्ही घटनेला आणि देशाच्या सार्वभौमत्वाला मानता का?
उत्तर - या वादावर बोलणाऱ्या कोणीही पुस्तक वाचलं आहे असं मला वाटत नाही. अन्यथा असे प्रश्न, मुद्दे त्यांनी उपस्थित केले नसते. आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे तशी मानली गेली असती तर आज जनतेची स्थिती अशी नसती. आताच्या प्रकरणात घटना ज्या लोकशाही बद्दल बोलके ती कुठे दिसते आहे. अशा पुरस्कार नाकारुन लोकशाहीची अवहेलना करणाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे.
पुरस्कार रद्द केल्यानंतर अनेकांनी पुरस्कार नाकारणं सुरु केलं आहे. तुम्हाला यातून काही साध्य होईल असं वाटतं का?
उत्तर- लोकांनी लोकशाही मुलासाठी उभं रहाणं गरजेचं आहे.
या पुस्तकातून माओवादी तत्वतज्ञानाचा प्रसार होईल असं नेते , मंत्री म्हणत आहेत?
उत्तर- असं म्हणणाऱ्यांनी पुस्तकाचा दाखला देऊन, पुस्तकात कुठे असा उल्लेख आहे ते सांगून बोलावं. पुस्तक फक्त अनुराधा मॉडेल बद्दल बोलतं. याबरोबरच यात स्वदेशीचाही मुद्दा मांडला गेला आहे ज्यातून देशाचे १७ टक्के जीडीपीचं कसं नुकसान होतंय हे दाखवलं आहे. हे तर इंग्रजांच्या राज्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. सरकार स्वदेशीबाबत बोलतं पण त्याची अंमलबजावणी कुठे करतं.
पुस्तकात तुम्ही अफजल गुरुबाबत लिहिलं आहे. हा भागही आक्षेपार्ह म्हणून सध्या सर्क्युलेट होतो आहे?
उत्तर- मी मला दिसलेल्या समजलेल्या अफजल गुरुबाबत लिहिलं आहे. लोकांना काय निष्कर्ष काढायचा तो काढू दे. मी कधीच त्याच्या विचारसरणीबाबत काही बोललो नाहीये. माणूस म्हणून मला तो कसा दिसला ते मी मांडलं आहे.
पुस्तक अनेक दिवसांपासून प्रकाशित होऊन लोकांनी ते खरेदी पण केलं आहे. या पुस्तकावर बहिष्कार घाला आणि पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीचा उगम कुठे आहे असं तुम्हांला वाटतं?
उत्तर – पुस्तकावर बंदी नाहीये. मात्र पुरस्कार रद्द केला गेला आहे. आणि ज्या समितीने तो दिला त्यांच्यासह प्रकाशक आणि अनुवादक या सर्वांवरच तो अन्याय आहे असं मला वाटतं.
नेत्यांना काही सांगायचं आहे?
उत्तर – मला जे म्हणायचं आहे ते मी पुस्तकात म्हणलं आहे. लोकांनी ते वाचून निष्कर्षापर्यंत पोहोचावं. मी स्वदेशईचा पुरस्कर्ता राहिलेलो आहे. लोकांचा–ब्राम्हणशाही वगळता इतर काळाचा म्हणजे चार्वाक, बुद्धीजम,भक्ती संप्रदाय, फुले पेरियार, आंबेडकर यांचा मी समर्थक आहे. त्यांचा याला आक्षेप का आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.