internet users 
मुंबई/पुणे

हे माहित आहे का? सव्वीस वर्षांपूर्वी इंटरनेटसाठी मोजावे लागत होते चक्क १५ हजार रुपये

Siddharth Latkar

सातारा : शिक्षण, बँकिंग, खरेदीपासून हॅकर्स आणि घोटाळ्यांपर्यंत इंटरनेट internet सर्वव्यापी झाले आहे. माेठ माेठ्या डेस्कटॉपवरून लोकांच्या तळहातावर इंटरनेट आले एक डिजीटल क्रांतीच झाली. इंटरनेटला आपल्या देशाच्या ई-क्षेत्रात प्रवेश करून तब्बल २६ वर्षे पुर्ण झाली. त्याकाळी विदेश संचार निगम लिमिटेड (व्हीएसएनएल) VSNL इंटरनेटच्या प्लॅनमध्ये १५ हजार रुपयांत प्रतिदिन ४० मिनिटांचा वापर देण्यात आल्याची नाेंद आहे.

विकीपिडीयाच्या नुसार भारतातील इंटरनेटची सुरुवात खरं तर १९८६ पूर्वी झाली. त्यावेळीस शैक्षणिक संशोधन नेटवर्क (ERNET) च्या स्वरूपात सुरू करण्यात आला होता. ज्याचा अर्थ केवळ शैक्षणिक आणि संशोधन समुदायांच्या वापरासाठी होता. हा भारत सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स विभाग (DOE) आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) यांचा संयुक्त उपक्रम होता, जो विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक सहाय्य प्रदान करतो.

सन १९८८ कालावधीत NICNet देखील होते. हे नेटवर्क सरकारी संस्थांमधील संवाद सुधारण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय माहिती केंद्राने चालवले होते. भारतात तंत्रज्ञान आणणे ही एक जिकरीची प्रक्रिया हाेती. विदेश संचार निगम लिमिटेड (व्हीएसएनएल) गेटवे इंटरनेट अॅक्सेस सर्व्हिस (जीआयएएस) म्हणून पहिल्यांदा सुरू केली. अनेक समस्यांवर मात करीत व्हीएसएनएलच्या इंटरनेट सेवेने लाँच झाल्याच्या पहिल्या सहा महिन्यांत दहा हजार ग्राहक मिळवले internet users. त्यावेळी सेवेत अनेक त्रुटी असल्याची तक्रार वाढली. त्यानंतर सेवेची पुन्हा रचना करण्यासाठी कंपनीने १०० ते १५० दशलक्षांची गुंतवणुक केली. त्यावेळी देशात आंतरराष्ट्रीय दळणवळणावर व्हीएसएनएलची मक्तेदारी होती. या क्षेत्रात खाजगी उद्योगांना परवानगीही नव्हती.

१५ ऑगस्ट १९९५ कालावधीत मुंबई, दिल्ली, कोलकात, चेन्नई येथे इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. व्हीएसएनएलच्या इंटरनेट सेवा व्यावसायिक, विना-व्यावसायिक, निर्यातदार आणि सेवा प्रदाता अशा पाच स्तरांमध्ये आल्या. प्रत्येक स्तरावरील वापरकर्त्यांसाठी, कनेक्टिव्हिटी एकतर डायल-अप ब्रॉडबँडद्वारे विद्यमान टेलिफोन ऑप्टिक्स वापरून किंवा समर्पित इंटरनेट लीज लाइनद्वारे प्रदान केली गेली.

भारतात इंटरनेट सेवांची सुरूवात ९.६ केबीपीएस वेगाने व्यावसायिक संस्थांसाठी २५० तासांच्या टीसीपी/आयपी खात्यासाठी २५ हजार रुपयांच्या दराने होते. इंटरनेटच्या प्लॅनमध्ये १५ हजार रुपयांत प्रतिदिन ४० मिनिटांचा वापर देण्यात आल्याची नाेंद आहे. सेवा प्रदातांसाठी सात लाखांपासून तीस लाखांपर्यंतचे पॅकेज हाेते.

vsnl internet rate chart

भारतातील पहिला सायबर कॅफे जुलै १९९६ मध्ये हॉटेल लीला केम्पिन्स्की, मुंबई येथे सुरु करण्यात आले. त्यावेळी इंटरनेटच्या एका तासासाठीच्या वापरासाठी आठशे रुपये आकारले गेल्याची नाेंद आहे.

डिजिटल क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये कनकसाबपती पांड्यन, व्हीएसएनएलचे अध्यक्ष बीके सिंगल, व्हीएसएनएलचे तंत्रज्ञान संचालक अमिताभ कुमार आणि अभिनेते शम्मी कपूर यांचा समावेश आहे. संगणकावरील प्रेम आणि इंटरनेटमध्ये त्यांना अपेक्षित असणारी डिजिटल क्रांती यासाठी या सर्वांना एकत्रित आणले गेले.

विकीपिडियाच्या माहितीनूसार गेल्या २६ वर्षांत इंटरनेटचे वापरकर्ते माेठ्या संख्येने वाढले आहेत. सन २०२० मध्ये ७१८.७४ दशलक्ष वापरकर्ते असल्याची नाेंद आहे. कंपन्यांच्या दरातील वाढत्या स्पर्धेमुळे इंटरनेटचे दर लाखाे रुपयांपासून हजार आणि शेकड्या पर्यंत उतरल्याने ही किमया साधली गेल्याचा दावा नेटीझन्स करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

SCROLL FOR NEXT