हिंजवडी पोलीस स्टेशन,  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

धक्कादायक! पुण्यात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, प्रतिकारानंतर दिले सिगारेटचे चटके

पुण्यातील आयटी सिटी अशी ओळख असलेल्या हिंजवडीत धक्कादायक प्रकार घडला आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पिंपरी: पुण्यातील आयटी सिटी अशी ओळख असलेल्या हिंजवडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीवर घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीनं प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी तिला सिगारेटचे चटके दिले. (Pune Breaking News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आयटी सिटी हिंजवडीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीवर दोन आरोपींनी घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीनं प्रतिकार केला. त्यावर आरोपींनी तिला सिगारेट आणि लोखंडी झाऱ्याने चटके दिले. या प्रकारानं भेदरलेल्या पीडित तरुणीनं हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हिंजवडी पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

'ती' घटना एकच, पण नेमकं काय घडलं?

पुण्यातील हिंजवडीमध्ये एका तरुणीवर घरात घुसून दोघांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. या तरुणीनं प्रतिकार केल्यानंतर दोघा आरोपींनी तिला सिगारेटचे चटके दिले. मात्र, याच तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन धावत्या रिक्षात चालकानं आणि त्याच्या साथीदारानं विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. मात्र, या दोन्ही घटना एकच असल्याचे तपासात उघड झाले. पीडित तरुणीनं भीतीपोटी प्रथम बंडगार्डन पोलिसांत अशी तक्रार केली होती. पण पोलिसांनी चौकशी केली असता, खरा प्रकार समोर आला. धावत्या रिक्षात अशी काही घटना घडलीच नाही, असं तिनं पोलिसांना सांगितलं. मात्र, त्यावर पुन्हा विचारलं असता, हिंजवडीत घडलेला प्रकार कथन केला. दरम्यान, हा प्रकार रिक्षात घडला नसून, हिंजवडीत घडला होता, अशी माहिती उघड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT