Kalyan News  Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News : भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार

Crime News : पीडित विद्यार्थीनीने तिची सुटका करुन घेतली. त्यानंतर तिच्यासह तिच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News : कल्याणमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

क्लासहून परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी विशाल या नराधमाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीने पाठलाग केला. त्यानंतर एका कोपऱ्यात तिला खेचत नेले तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

पीडित विद्यार्थीनीने तिची सुटका करुन घेतली. त्यानंतर तिच्यासह तिच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत तातडीने आरोपी विशालच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप दिसत नव्हता.विशाल याचा माज इतका आहे की पत्रकारांच्या कॅमेऱ्याकडे बघून त्याने Victory ची साईन दाखवली. (Crime News)

आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. याआधी देखील आरोपीविरोधात बलात्कार, विनंयभंगाचे पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आरोपीवर चोरी आणि लुटीचे देखील गुन्हे दाखल आहेत. विशालला याआधी तडीपार देखील करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT