Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला; काच फुटली, सोमय्या जखमी, म्हणाले... SAAM TV
मुंबई/पुणे

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला; काच फुटली, सोमय्या जखमी, म्हणाले...

भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याच्या भेटीला गेले होते.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: सध्या अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या भेटीसाठी खार पोलीस ठाण्यात गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली. जमावानं त्यांच्या कारवर दगडफेक केली. त्यानंतर सोमय्या यांच्या कारची काच फुटली. ती काच सोमय्या यांच्या हनुवटीवर लागली. यात ते जखमी झाले. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याच्या भेटीला गेले होते. तेव्हा त्यावेळी शिवसैनिकही उपस्थित होते. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनमधून निघून बांद्रा पोलिस स्टेशनला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. यात त्यांच्या गाडीची काच फुटली असून ते जखमी झाले आहेत. जोपर्यंत हल्लाकरणाऱ्या शिवसैनिकांना अटक होत नाही तोपर्यंत गाडीतून उतरणार नाही असा पवित्रा सोमय्या यांनी घेतला आहे.

दरम्यान कलम १५३ (A) अंर्तगत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. राणा दाम्पत्यावरील कारवाई बेकायदेशीरअसल्याचे मत राणांच्या वकिलांनी व्यक्त केले होते. नवनीत राणा, रवी राणा यांना खार पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्यांनी उद्धवठाकरेंविरोधात शिवीगाळ केली आहे. त्यामुळे आता याचीही तक्रार शिवसेना ठिकठिकाणी दाखल करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT