Mumbai Airport Incident Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Airport Incident: 'व्हिस्टारा'ची एअर होस्टेस दोन वर्षांच्या चिमुकलीसाठी बनली देवदूत, सीपीआर देऊन वाचवले प्राण

Vistara Air Hostess : केसांग भूटीया या एअर होस्टेसच्या सतर्कतेमुळे एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Airport Incident

मुंबई विमानतळ भारतातील व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. दरम्यान अलीकडेच व्हिस्टारा एअरलाईनच्या एअर होस्टेसच्या सतर्कतेमुळे एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला आहे. केसांग भूटीया असं या एअर होस्टेज नाव आहे.

केसांग भूटीया १८ सुप्टेंबर रोजी बोर्डिंग गेटवर असताना मुंबई दिल्ली UK ९८६ या विमानाची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांमधून कोणाच्या तरी मोठ्याने रडण्याचा आवाज आला. केसांगने लगेचच रडण्याचा आवाज येत असलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी तिला एक दोन वर्षांची मुलगी श्वाच्छोश्वास बंद पडल्यामुळे निपचित पडलेली दिसली. तिने आजुबाजीला डॉक्टरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे तिने वेळ न दवडता सहकारी क्रू मेंबर फैझान खान यांच्या मदतीने त्या मुलीला सीपीआर दिला आणि त्या मुलीचे प्राण वाचविण्यात तिला यश आलं, त्यांनतर डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आणि त्या मुलीला अधिक उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, अशी माहिती एरलाईनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सीपीआर म्हणजे काय ?

सीपीआर ही एक आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे. श्वाच्छोश्वास किंवा हृदयाचे ठोके बंद पडल्यांनंतर या पद्धतीचा वापर केला जातो. इलेक्ट्रीक शॉक, हृदयविकाराचा झटका किंवा पाण्यात बुडालेल्या परिस्थितीत याचा खूप फायदा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: दीपक केसरकरांसाठी मुख्यमंत्र्यांंच्या सूनबाई मैदानात

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

SCROLL FOR NEXT